Ad will apear here
Next
अझर गोट्या इलेव्हन संघाने जिंकला स्वच्छता करंडक

पुणे : पुणेकरांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे, यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याच्या उद्देशाने माय अर्थ फांउडेशन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्वच्छता करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अझर गोट्या इलेव्हन या क्रिकेट संघाने हा ‘स्वच्छता करंडक’ जिंकला.

सुरज दादा निंबाळकर संघाला द्वितीय, तर जय गणेश इलेव्हन संघाला तृतीय  क्रमांकाचे बक्षीस मिळाले. ‘मॅन ऑफ द मॅच’चा सन्मान पप्पु रामगुडे याला, तर अजय आवळे सर्वोत्तम गोलंदाज आणि तुषार रणदिवे सर्वोत्तम फलंदाज ठरले.  तळजाई येथील सदू स्टेडियम येथे हे सामने झाले. यात पुणे शहरातून ४० क्रिकेट संघांनी सहभाग घेतला होता. 

‘स्वच्छता करंडक’ समारोपप्रसंगी पुणे महानगरपालिकेचे  सहआयुक्त ज्ञानेश्वर मोळक, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे भालचंद्र जगताप, नॅशनल सॉलिड वेस्ट असोसिएशन ऑफ इंडियाचे नितीन देशपांडे, पराग मते, ललित राठी, नितीन कदम, राहुल माने, अनिल छाजेड, मनीष जगदाळे, किशोर रजपूत, स्वप्नील नाईक, हरीश चांदवानी, श्री. घळसासी, विकास पाटील, प्रसाद चावरे, श्रीकांत मेमाणे, हरीश खर्डेकर, किशोर कांबळे आदी  उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संयोजन प्रकाश चव्हाण, महेश चरवड, मनीष घरत यांनी केले, तर आयोजन ‘माय अर्थ’चे अध्यक्ष अनंत घरत यांनी केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZBKCH
Similar Posts
सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट रंगणार दोन डिसेंबरपासून पिंपरी : ‘देशभरात विखुरलेला सिंधी समाज एकत्रित यावा, तंदुरुस्तीचे महत्त्व पटवून द्यावे, तसेच मोबाइल-इंटरनेटच्या जाळ्यात न अडकता मैदानावरील खेळण्याला प्राधान्य द्यावे यासाठी आयोजित केली जाणारी सिंधी प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा यंदा दोन डिसेंबर ते १८ डिसेंबर २०१९ या कालावधीत पिंपरी येथे रंगणार आहे. पिंपरी
टाकाऊ घटकांपासून बनवलेल्या कपड्यांचा अनोखा फॅशन शो पुणे : ‘पुणे तेथे काय उणे’ ही उक्ती सार्थ करत, पुण्यामध्ये चक्क कचरा या संकल्पनेवर आधारित फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. मिस आणि मिसेस माय अर्थ नावाच्या या फॅशन शोमध्ये प्लास्टिक बाटल्या, प्लास्टिक पिशव्या, इलेक्ट्रॉनिक वेस्ट (खराब झालेले की-बोर्ड, माउस, सीडी, डीव्हीडी) आणि इतर टाकाऊ वस्तूंपासून बनविलेले ड्रेस सादर करण्यात आले
‘उच्च शिक्षणासाठी सामाजिक संस्थांचा हातभार महत्त्वाचा’ पुणे : ‘शेतीविषयक शिक्षणामध्ये नाविन्यपूर्ण बदल केले जात आहेत. सरकारनेही चांगल्या योजना निर्माण केल्या आहेत. शिवाय, आपल्याकडे बहुतांश विद्यार्थी मुख्य व्यवसाय शेती असलेल्या भागातून येतात. मात्र, आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांना उच्च शिक्षण घेण्यात अडचणी येतात. अशावेळी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या
पुण्यात सुरू आहे जागतिक गो-परिषद; देशी गोवंशांच्या प्रदर्शनाचेही आयोजन पुणे : देशी गायींचे महत्त्व लक्षात येण्यासाठी आणि त्या संदर्भात जागृती करण्यासाठी पुण्यात बालेवाडी येथे कामधेनू सेवा प्रतिष्ठानतर्फे ‘वर्ल्ड काऊ कॉन्फरन्स अँड ॲग्री एक्स्पो’ अर्थात देशी गोवंशाविषयीच्या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या निमित्ताने बालेवाडीतील मोझे महाविद्यालयाच्या मैदानावर

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language